पुण्यात चक्क वाहतूक पोलीस अधिकारी महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यात चक्क एका वाहतूक पोलीस अधिकारी महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 5 जुलै रोजी रात्री आठ वाजता फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या समोरच घडली आहे. संजय फकिरा साळवे (रा. पिंपरी चिंचवड) हा इसम ड्रंक अँड करत होता. त्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मद्यपान केलेल्या या आरोपीने चक्क वाहतूक पोलीस स्टेशनच्या समोरच महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. तात्काळ या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्यात या संदर्भात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपीला तात्काळ अटक देखील करण्यात आली आहे. तसेच या संदर्भातला पुढील तपास देखील पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
या घटनेमुळे पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस अधिकारी सुरक्षित नसतील तर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये पोलिसांचा कसलाही धाक राहिला नसल्यामुळे पोलिसांनाही अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे.