पिंपरी-चिंचवड शहरातील चरहोली येथे काल दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान स्कूलबस चालकाचं बस वरील नियंत्रण सुटल्याने बस इंद्रायणी नदीच्या पुलावरील कठड्याला जाऊन धडकली आहे.
चरहोली येथील दाभाडे चौका जवळील इंद्रायणी नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली.ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी बस मध्ये जवळपास 60-70 विद्यार्थी प्रवास करत होते अशी माहिती स्थानिक नागरिकानी दिली. स्थानिक नागरिकांनी अपघात झाल्यानंतर बसचे काही काच फोडून बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून बचाव कार्य केला.अपघात झालेली बस ही लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये स्कूल बस सुरक्षा विषयी पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.
काळ आला होता, पण…. शाळेची बस इंद्रायणी नदीत कोसळता कोसळता बचावली.. पाहा नेमकी कुठे घडली घटना?