Crime

तो आला, बॅगेतलं पिस्तूल काढलं अन् गोळ्या झाडल्या..; चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर भर दिवसा गोळीबार

530 0

राज्यभरात गोळीबारांचं सत्र सुरू आहे. अशातच चंद्रपुरात देखील एका मनसे पदाधिकाऱ्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. या गोळीबारात अमन अंधेवार नावाचा युवक जखमी झाला असून अमन हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पूर्व वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय घडलं ?

मनसे पदाधिकारी अमन अंधेवार यांचे रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये कार्यालय आहे. त्यामुळे याच परिसरात ते फोनवर बोलत होते. त्यावेळी अचानक एक व्यक्ती तिथे येतो. त्याच्या पाठिवर बॅग असते. तो बॅगेतून बंदूक काढतो आणि अमन यांच्यावर गोळीबार करतो. अमन जीव वाचवत पळतात मात्र तरीही त्यांना गोळ्या लागतात. तर दुसरीकडे आरोपीदेखील गोळीबार करुन तिथून पळून जातो.

अमन आणि या आरोपीचे जुने वाद असल्याचे माहिती मिळत आहे. याच वादातून वर्षभरापूर्वी याच ठिकाणी अमन यांच्या भावावर देखील याच आरोपीने गोळीबार केला होता. आता अमन यांच्यावर देखील त्यानेच गोळीबार केला. या हल्ल्यात अमन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!