Beed:

तो कामाच्या निमित्ताने केबिनमध्ये बोलवायचं अन्…;पुण्यातील महिला मॅनेजरची कंपनी मालकाविरोधात पोलिसात धाव

443 0

कंपनीत काम करणाऱ्या महिला मॅनेजर सोबत असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या कंपनीत घडला आहे. कंपनीतील महिला मॅनेजर बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न सातत्याने करणाऱ्या मालकाविरोधात महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. या संदर्भात मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 5 मार्च ते 3 जून या कालावधीत घडला. याबाबत 26 वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मुकेश कलानी हा कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या एका रिटेल कंपनीचा मालक आहे. फिर्यादी महिला ही या कंपनीत सिनियर कॉर्पोरेट मॅनेजर या पदावर काम करते. या महिलेने केलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने कलानी हा कामाच्या बहाण्याने केबिनमध्ये बोलावून जवळीक साधण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. त्याचबरोबर कंपनीच्या बाहेर पडल्यानंतर घरी जाताना, जिम मध्ये जाताना पीडित महिलेचा पाठलाग करत होता. नकार देऊनही महिलेच्या घरच्या पत्त्यावर भेटवस्तू पाठवत होता. हा प्रकार वारंवार घडल्याने अखेर या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून मुकेश नयनमल कलानी Mukesh Nayanmal Kalani (रा. शहनशाह सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 74, 78, 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आरोपीने पीडित महिलेला धमकावण्याचाही प्रयत्न केला होता. मला नेहमी भेटत जा, नाहीतर माझ्याकडे असलेले तुझ्यासोबत चे पार्टी मधले फोटो व्हायरल करेल, अशी धमकी तो सातत्याने देत होता. त्यामुळे अखेर या ब्लॅकमेलिंगला कंटाळून या व पीडितेने पोलिसात धाव घेतली असून कंपनी मालक असलेल्या आरोपी विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!