Ghati Hospital

Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग

1442 0

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात रॅगिंगविरोधात कठोर कायदा केला असला तरी अद्यापही काही महाविद्यालयात रॅगिंगच्या (Ragging In Ghati Hospital) घटना घडत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रॅगिंगचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना 25 हजार रुपये दंड ठोठावल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडून देण्यात आली आहे.

कधीपासून सुरु होता प्रकार?
घाटी रुग्णालयाच्या एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील सहा विद्यार्थी द्वितीय वर्षातील सहा विद्यार्थ्यांना चहा, कॉफी, नाष्टा सिगारेट आणायला सांगून सतत त्रास देत होते. हा प्रकार गेल्या 3 महिन्यांपासून सुरू होता.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी केली तक्रार
शनिवारी रात्री द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे काम ऐकले नाही. त्यामुळे त्यातील एका विद्यार्थ्याने त्याची कॉलर पकडली आणि शिवीगाळ केली. या प्रकारामुळे चिडलेल्या विद्यार्थ्याने वडिलांना सगळ्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. घाटी रुग्णालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

Share This News
error: Content is protected !!