दिल्लीत मोदी सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. उद्या म्हणजेच रविवारी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
राष्ट्रपती कार्यालयाकडून या शपथविधीची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे.यात विशेष म्हणजे मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच रविवारी संबंधित परिसरातील विमानांना हवेत गिरड्या घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आला आहे शपथविधीच्या आधी नो फ्लाय होऊन घोषित करण्यात आले आहे. 9 जून रोजी संध्याकाळी सात वाजून 15 मिनिटांनी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे तसेच या ठिकाणी जबरदस्त असा पोलीस बंदोबस्त ही तैनात आहे.