रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

1340 0

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रामोजी समुहाचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन झालं असून गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 5 जून रोजी प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता निधन झालं आहे.

 

रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातो आहे. रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लिहिले की, “मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या निधनाचं वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो,” या आशयाची पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!