Vasant More

कोकणात जाऊन काही लोक; पदवीधर निवडणुकीत मनसेने माघार घेतल्यानंतर वसंत मोरे यांची अभिजीत पानसेंवर नाव न घेता टीका

1671 0

राज्यात होत असलेल्या कोकण पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजीत रमेश पानसे यांना कोकण पदवीधरच्या मैदानात उतरवलं होतं मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर मनसेनं कोकण पदवीधर निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत भाजपा उमेदवार निरंजन वसंत डावखरे यांना पाठिंबा दिला आहे.

हा पाठिंबा जाहीर केल्यानंतर एकेकाळचे राज ठाकरे यांचे विश्वासू आणि सध्याचे वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांची पोस्ट चर्चेत आली असून त्यांनी नाव न घेता अभिजीत पानसेंवर टीका केली आहे.

कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली अशी पोस्ट वसंत मोरे यांनी आपल्या सोशल मीडियावर केली आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!