BJP New Slogan

अखेर ठरलं! नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

2036 0

नवी दिल्ली: देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीएला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आज दिल्लीतील संसद भवनात पार पडलेल्या एनडीए आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. 

9 जून रोजी संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून एनडीए आजच राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.

एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले विश्वास हीच मोठी संपत्ती असून 22 राज्यांनी एनडीएला सेवा करण्याची संधी दिली एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आपल्या सर्वांमध्ये विकासाचा सेतू मजबूत आहे.

निवडणुकीत मित्र पक्षांनी खूप मेहनत घेतली तुम्ही सर्वांनी मला नवी जबाबदारी दिली असं म्हणत एनडीएच्या मित्र पक्षांचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले.

Share This News
error: Content is protected !!