Beed:

लग्नाला नकार देताच सराईत गुन्हेगाराने घेतला तरुणीचा चावा

1240 0

पुणे – एकतर्फी प्रेमातून येरवड्यातील साळवेनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तरुणीचे अपहरण करून लग्न करण्याची मागणी केली. तरुणीने नकार देताचया तरुणाने तिचा चावा घेऊन तिला मारहाण केली.

निहाल विशाल भाट ( रा . कंजारभाट , येरवडा ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरुद्ध अपहरण, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घरात असताना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता निहाल तेथे आला. हातात चाकू घेऊन तो तिच्या घरासमोर उभा राहिला. ‘तू घराबाहेर ये , माझ्यासोबत चल. तू जर बाहेर आली नाही तर , मी दरवाजा तोडून घरात घुसेल. मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर , मी त्याला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली.

त्यानंतर भाट याने चाकूचा धाक दाखवून या तरुणीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून स्वत : च्या घरी नेले. “माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यासोबत लग्न कर” असे तिला म्हणाला. तिने नकार देताच त्याने या तरुणीच्या तोंडावर मारहाण करुन दंडावर, पाठीवर, गालावर दाताने चावे घेऊन जखमी केले. तसेच हातातील चाकूने उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारुन जखमी केले. या तरुणीने स्वत : ची सुटका करुन घेतली. जखमांवर उपचार केल्यानंतर रविवारी तिने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक गोताडे पुढील तपास करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide