एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय – गिरीश महाजन

425 0

पुणे- ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडले असून ते अनेकदा बेछूट आरोप करताना दिसून येतात. लायकी नसताना पक्षाने एकनाथ खडसे यांना मोठी पदे दिली यावरून खडसेंनी पक्षाला मोठं केलं का ? पक्षाने खडसेंना मोठं केलं ?’ असा सवाल उपस्थित करत भाजपा नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला.

पुण्यातील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी हे वक्तव्य केलं. त्याचबरोबर राज्यात विजेची कृत्रिम टंचाई असून टक्केवारीसाठी महाविकास आघाडी टंचाई भासवत असल्याचा गंभीर आरोप देखील महाजन यांनी यावेळी केला.

‘सारखं मी मोठं केलं मोठं केलं’ असं खडसे म्हणतात. तुम्ही मोठं केलं की तुम्हाला पक्षाने मोठं केलं ? खडसे स्वतःची पाठ थोपटून घेताहेत, त्यांचं मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना मी जेवढा ओळखतो तेवढा कोणी ओळखत नाही, 25 वर्ष मी त्यांच्यासोबत होतो. मानसिक संतुलन बिघडलेल्या माणसावर परत काय बोलणार? अजून त्यांचं मानसिक संतुलन बिघडवायचं नाही, मला त्यांची काळजी आहे असा टोला गिरीश महाजनांनी खडसेंना लगावला आहे.

Share This News
error: Content is protected !!