BJP

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : भाजपनं खातं खोललं ! निकालाआधीच ‘या’ ठिकाणी मिळवला विजय

382 0

सुरत : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Lok Sabha Election Result 2024 Live Updates) येत्या काही वेळात सुरूवात होणार आहे. देशात लोकसभेच्या 543 जागा असून यात सूरतची एक जागा भाजपने बिनविरोध जिंकली आहे. तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात मतदान होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले. मुकेश दलाल असे विजयी झालेल्या उमेदवाराचे नाव आहे.

भाजपच्या मुकेश दलाल यांच्याविरोधात काँग्रेसचे नीलेश कुंभानी यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज रद्द ठरवण्यात आला. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाल्याचं सांगितलं. याबद्दल मुकेश दलाल यांचे अभिनंदनही केलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!