आजपासून बँका सुरू होण्याची वेळ बदलली, हे नवे वेळापत्रक

2803 0

नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रविवारी बँकिंगच्या वेळेतही बदल केला आहे. आज, सोमवार, 18 एप्रिल 2022 पासून, देशातील बँका सकाळी 9 वाजल्यापासून उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना बँकिंग कामासाठी एक तसंच जास्त अवधी मिळणार आहे.

कोरोना संसर्गामुळे बँकांचे कामकाजाचे तास कमी करण्यात आले होते. मात्र परिस्थिती सामान्य झाल्यामुळे बँकांच्या कामकाजाच्या वेळेत हा नवा बदल करण्यात आला आहे. ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच सर्व बँकांना कार्डलेस व्यवहार सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच लवकरच बँकेच्या सर्व ग्राहकांना एटीएममधून कार्डलेस व्यवहाराची सुविधा मिळणार आहे.

Share This News
error: Content is protected !!