Samruddhi Highway Accident

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

687 0

नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेईना. समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून हा महामार्ग अपघाताचे (Samruddhi Highway Accident) हॉटस्पॉट ठरले आहे. महामार्गावर कारला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. नाशिक वरून कोलकाताकडे डाळिंब घेऊन जाणाऱ्या ट्रकचा बुलढाणा नजीकच्या शेलगाव देशमुखजवळ हा अपघात झाला आहे.

कसा झाला अपघात?
नाशिकवरुन ट्रक क्र. WB23F 6538 हा डांळीब घेऊन कोलकाताकडे समृद्धी महामार्गावरुन जात होता. दरम्यान, डोणगांव जवळ शेलगाव देशमुख अंडरपास पुलाजवळ एक छोटी कार भरधाव वेगाने येऊन ओव्हर टेक करत होती. दरम्यान ट्रक चालकाचे अचानक आलेला कारला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. हा ट्रक महामार्गावरील अंडरपासच्या भिंतीला धडकून पलटी झाला. यामध्ये ट्रकचा चालक आणि वाहक दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात जर अंडरपासची भिती नसती तर ट्रक थेट खाली शेलगाव देशमुख रस्त्यावर पडला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, ट्रक चालकाने प्रसंगावधान राखात परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना ! अल्पवयीन मुलीने दिलेल्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Politics : 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का ! ‘हा’ निष्ठावंत शिलेदार सोडणार साथ

PUNE ACCIDENT BREAKING NEWS: ब्रह्मा रियालिटी चे संचालक विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरमधील अनधिकृत रिसॉर्ट सील

PUNE PORSCHE CAR ACCIDENT: अल्पवयीन कारचालक आरोपी वेदांत विशाल अग्रवालची आई शिवानी अग्रवालला अखेर अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!