Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

429 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात काल मध्य रात्री एकच्या सुमारास यशवंत नगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये एका तरुणाने आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचं पाहून मुलाच्या अंगावरती चार चाकी घातली. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

या घटनेमध्ये दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला असून त्याच्यावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय सी एम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुशील काळे असे अंगावर चारचाकी गाडी घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे तर निलेश शिंदे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आपली प्रेयसी निलेश शिंदे या तरुणासोबत बोलत थांबल्याचे पाहून राग अनावर झाल्याने सुशील काळेने आपली चार चाकी गाडी निलेश शिंदे यांच्या अंगावर घातली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सुशील काळे यांच्या विरोधात 307 अंतर्गत खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!