Ahmednagar News

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

487 0

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) अकोले तालुक्यातील सुगावा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रवरा नदीपात्रात बुडुन मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात पलटली. या बोटीतील 3 जवानांचा देखील बुडून मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची माहिती घेतली. अकोलेतील सुगाव जवळ ही घटना घडली आहे. प्रकाश शिंदे, वैभव वाघ, राहुल पावरा अशी मृत जवानांची नावे आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!