आनंद महिंद्रांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

447 0

वेगवेगळ्या कल्पनाशक्तींचे कौतुक करणारे उद्योगपती म्हणून महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांची ओळख सर्वश्रुत आहे. उद्योग-व्यवसाय वाढवण्याच्या अनोख्या, डोकेबाज कल्पनांचं महिंद्रा नेहमी कौतुक करत असतात.

मुंबईच्या हिरव्यागार छताची अनोखी रचना असलेल्या बस स्टॉपचा व्हिडीओ शेअर केला आहे. आता अखेर मुंबईला जागतिक दर्जाचा बस स्टॉप मिळाला आहे. बसस्टॉपचं हे अत्यंत नेत्रसुखद चित्र दिसत आहे. त्यातले अनोखे बदल आणि पर्यावरणपूरक हिरवाई हे खरंच सुंदर आहे, असं त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

 

या संदेशासोबत त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनाही टॅग केलं आहे. महिंद्रा यांच्या ट्वीटला प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनीही त्यांचे आभार मानले आहेत. सार्वजनिक वाहतूक जास्तीत जास्त सुखकर व्हावी तसंच एक शहरातल्या सुविधा सुरेख दिसाव्यात, यासाठी ही कल्पना होती. ज्यावेळी आम्ही एसी इलेक्ट्रिक बस आणत आहोत, तर दुसरीकडे आपण बस स्टॉपही अधिक सुखकर व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!