Pune News

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

511 0

पुणे : पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले. शहरातील कल्याणीनगर येथील परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीला चांगलाच चोप दिला आणि त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर 15 तासांनी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. यामध्ये हद्द म्हणजे आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी भूक लागली म्हणून डझनभर पिझ्झा पोलीस ठाण्यात मागवले होते असा आरोपी मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच आम्ही मुलगा मद्य पिल्याने त्याची ब्लड टेस्ट घ्या, असे म्हणताच पोलिसांनी तुमचेच रक्त काढतो आता असा दम भरला,’ असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

मृतांचे नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत
“आमचे पुण्यात कोणीही नातेवाईक नाहीत. तसेच येथे कोणाशी ओळखही नाही. पोलिसांचे एकंदर वर्तन बघता ते आरोपीच्या बाजूने भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. यामुळे आम्हाला न्याय मिळेल,’ असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

नेमके ‘त्या’ रात्री काय घडले होते?
सदरील आरोपी हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. तो नुकताच बारावी पास झाला आहे. मित्रांसोबत त्याने एका हॉटेलमध्ये पार्टी केली. यानंतर तो पबमध्ये गेला होता. पार्टी संपल्यावर चालकाला शेजारच्या सीटवर बसवले होते. मद्याच्या नशेत त्याने गाडी भरधाव चालवली. ट्रम्प टॉवर समोर आल्यावर त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटून अपघात झाला. त्याच्या वडिलांनी नुकतीच ही आलिशान कार विकत घेतली होती, अशी माहिती येरवडा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अनिसच्या आई वडिलांना मुलाच्या मृत्यूची कल्पना नाही
या अपघातातील मृत युवक अनिस यांचे कुटुंबिय मध्य प्रदेशात व्यावसायिक आहेत. अनिस आणि त्याचा चुलत भाऊ हे दोघेच नोकरीनिमित्त घर सोडून बाहेर रहात आहेत. पालकांनी अनिसला महिनाभर घरी बोलावले होते. मात्र, त्या अगोदरच ही घटना घडली. पुण्यात शिक्षण झाल्याने त्याने पुण्यातच नोकरी पत्करली होती. तर त्याचा छोटा भाऊही पिंपरीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. भावाच्या अपघाती मृत्यूने त्यालाही धक्का बसला आहे. “अनिसच्या आई-वडिलांना ही घटना नातेवाईकांनी सांगितली नाही. त्यांना कळू नये म्हणून गावाकडील नातेवाईकांनी टीव्ही बंद करुन ठेवला आहे तसेच त्यांचे मोबाइलही काढून घेतले आहेत. आता मृतदेह गावाला गेल्यावरच त्यांना कळेल,’ असे अनिसच्या चुलत भावाकडून सांगण्यात आले आहे.

आश्विनीच्या कुटुंबियांना मोठा धक्का
अश्‍विनी ही “वर्क फ्रॉम होम’ करत होती .यामुळे तिच्या आईने तिला “थोडी घराबाहेर पडत जा, बाहेर फिरुन येत जा’ असा सल्ला दिला होता. यामुळे ती शनिवारी रात्री मित्रांबरोबर पबला गेली. जाताना तिने आईला फोनही केला होता. पबमधून बाहेर पडल्यावर थोडावेळ ती मित्रांबरोबर रस्त्याच्याकडेला गप्पा मारत थांबली होती. यानंतर तिला अनिसने रुमवर सोडण्यासाठी गाडीवर बसवले. पबचा रस्ता क्राॅस करताच लगेचच हा अपघात घडला. आपल्या मुलीच्या अपघाताची बातमी समजताच तिच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

आरोपीला जामीन मंजूर
पुण्यातील या हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या अपघातातील आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला. १५ तासानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केला. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

या अटींवर केला जामीन मंजूर
1. आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
2. त्याला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.
3. त्याला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.

उत्पादन शुल्क विभागाकडून 2 बार मालकांविरोधात चार्जशीट दाखल
अल्पवयीन मुलांना दारू पुरवणाऱ्या बारबद्दल स्थानिकांनी उपस्थित केलेल्या चिंतेनंतर, पुणे उत्पादन शुल्क विभागाने अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याबद्दल आणि आवश्यक नियामक आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल दोन बार मालकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सागर चोरडिया आणि घोरपडी येथील ट्रिलियम सिक्युरिटीजचे प्रल्हाद भुतडा यांच्याविरुद्ध ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या वर गुन्हा दाखल
आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सागर चोरडियाविरुद्ध चार्जशीट दाखल

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!