Beed News

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

316 0

बीड : बीडमधून (Beed News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव वाळूच्या टिप्परने एका रिक्षाला भीषण धडक दिली आहे. या अपघातामध्ये रिक्षाचालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना तातडीने स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीड शहरातील बिंदुसरा पुलावर हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे काही काळ पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती.

कसा झाला अपघात?
वाळूने भरलेल्या विनापरवाना भरधाव हायवाने प्रवासी रिक्षाला समोरून धडक दिल्याने रिक्षाचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना बीड शहरांतील बार्शी रोडवर सोमेश्वर मंदिराजवळ घडली. अपघातानंतर या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निष्काळजीपणाने हायवा चालवून रिक्षाला धडक देऊन रिक्षाचालक व दोन प्रवाशांना जखमी केल्याप्रकरणी पोलीस शिपाई डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!