लालपरी येतेय पूर्वपदावर ; सात दिवसांत 340 कर्मचारी कामावर रुजू

179 0

मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून आता हा संप अंतिम टप्प्यात आला असून संपातील एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत.

मागील सात दिवसांत ३४० कर्मचारी कामावर आल्याने बसच्या संख्येतही वाढ होत आहे. पुणे विभागाच्या  दररोज ३७० बस वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. बसची संख्या वाढल्याने प्रवासी संख्या, एसटीच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याच्या मार्गावर आहे. कर्मचाऱ्यांचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या शेवटच्या अल्टीमेटमनंतर कर्मचारी पुन्हा कामावर येत आहेत. मागील सात दिवसांत पुणे विभागात जवळपास ३४० कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे बसच्या संख्येत वाढ झाली. आता पुणे विभागात ३७० बस धावत आहेत.

 

सद्य:स्थिती

बसची संख्या : ३७०

रोजचा प्रवास : दीड लाख किलोमीटर

उत्पन्न : ७५ लाख रुपये

कामावर हजर कर्मचारी : १९००

प्रवासी संख्या : ६५ हजार

 

Share This News
error: Content is protected !!