काल महाआरती आज पत्रकार परिषद ; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

332 0

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे..

काल पुण्यातील खालकर चौकातील हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून जोरदार टीका होत आहे.

आज राज ठाकरे त्याला काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांची पुण्यात पत्रकार परिषद आहे.

कालच संजय राऊतांनी राज ठाकरे यांना ‘नवहिंदुत्ववादी ओवेसी’ असं संबोधत त्यांच्यावर टीका केली होती. तसंच गहमंत्र्यांनीही राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला केराची टोपली दाखवत मशिंदींवरील भोंगे उतरवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देणार, पुढील भूमिका काय असेल या प्रश्नांचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!