Ravindra Dhangekar

Pune Loksabha : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

479 0

पुणे : पुण्यातून (Pune Loksabha) एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या जमाव केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

नेमकं प्रकरण काय ?
पुण्यात 13 मे रोजी मतदान पार पडले. त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजेच 12 मे रोजी सायंकाळच्या सुमारास पुण्यातील पर्वती, सहकार नगर भागात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांच्या समर्थक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले होते. काही वेळातच महायुतीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झाले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी पुणे पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले. मात्र महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा कोणताही पुरावा नसल्याने रवींद्र धंगेकर यांच्या आंदोलनानंतरही तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी काही काळ पोलिसांनाही वेठीस धरले होते. त्यात जवळच मतदान केंद्र देखील होते. त्यामुळे बेकायदेशीर रित्या जमाव केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 143, 147 आणि 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Beed News : मतदान केंद्राबाहेर गोंधळ, उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा तरीही विक्रमी मतदान!

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Sushma Andhare : “राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत”, सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना दिले ओपन चॅलेंज

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!