Maharashtra Election

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

351 0

पुणे : जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी १३ मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.

मुंबई मार्केट अँड फेअर ऍक्ट १८६२ चे कलम ५ अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार १३ मे रोजी बंद राहतील.

या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अँड फेअर ऍक्ट १८६२ मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide