‘द काश्मीर फाइल्स’ नंतर विवेक अग्निहोत्री याने केली नव्या चित्रपटाची घोषणा

519 0

मुंबई- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाला देशातच नाही तर परदेशातही भरभरून प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता विवेकने त्याच्या नव्या प्रोजेक्टचा खुलासा केला आहे. याची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिली आहे.

विवेक अग्निहोत्रीनेही ट्विट करून आपल्या नवीन चित्रपटाचे शीर्षक दिले आहे. त्यांनी लिहिले की, ज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. गेल्या ४ वर्षात आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. मी कदाचित तुमचा TL स्पॅम केला असेल पण काश्मिरी हिंदूंवरील नरसंहार आणि अन्यायाबद्दल लोकांना जागरुक करणे खूप महत्वाचे आहे.

पुढच्या चित्रपटाचे नाव काय ?

त्याने पुढे लिहिले की आता त्याच्या नवीन चित्रपटावर काम करण्याची वेळ आली आहे. #TheDelhiFiles. विवेकच्या पुढील चित्रपटाचे नाव ‘द दिल्ली फाइल्स’ असे असेल. मात्र, या चित्रपटाची थीम आणि स्टारकास्ट याबाबत त्याने काहीही खुलासा केलेला नाही.

विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या स्टार्सनी या चित्रपटात आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. या चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या दुरवस्थेचे वर्णन केले आहे, ज्यांना काश्मीरमधून स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले.

 

Share This News
error: Content is protected !!