पुणे- मनसेच्या हनुमान चालीसा वाजवण्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे. उद्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनसे पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरे महाआरती करणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या वतीने साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या शिवानी माळवदकर यांच्या वतीने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिम बांधव रोज सोडणार आहेत. त्यामुळे उद्या पुण्यात राजकारण चांगलेच पेटणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. मशिदीवरील भोंगे काढावेत अन्यथा मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन देखील केले होते. सध्या रंजन आहे, वातावरण शांत राहावे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.
एकूणच हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्यात राजकारण ढवळून निघणार आहे.