KPK Jeyakumar

KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह

1221 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तामिळनाडूमधील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा मृतदेह (KPK Jeyakumar) आज तिरुनेलवेली या ठिकाणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये त्यांच्या मृतदेह आढळला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आहेत.

मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना मृतदेहाजवळ केपीके जयकुमार यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केपीके जयकुमार बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. केपीके जयकुमार यांच्या मृत्यूच्या घटनेला राजकीय स्वरूप प्राप्त झालं आहे.

एआयएडीएमके प्रमुख इपीएस यांनी, ही घटना म्हणजे ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कळस असल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Share This News
error: Content is protected !!