पुणे- पुण्यातील वारजे पुलावर आज, गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
येथील माई मंगेशकर रुग्णालयाच्या समोरील पुलावर एका वँगनार कारचा अचानक कमी वेग झाल्याने त्या गाडीवर मागून येणारा ट्रक धडकला तर पुढे टँकर असल्याने ही गाडी दोन वाहनामध्ये अक्षरशः चेंबली गेली. यामध्ये एकाच कुटुंबातील नवरा- बायको आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर माई मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका विचित्र, भयंकर होता, की गाडीचा कोणता भाग नीट ओळखता येत नव्हता.
जखमीची नावं अदयाप समजली नाही. या अपघातामुळे या मार्गावर खूप लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.या मार्गावरील वाहन सर्व्हिस रोडवर उतरल्याने वारजेमधील वाहतूक विस्कळीत झाली.