Breaking News
Crime

पुण्यात सराईत गुन्हेगाराचा दगडानं ठेचून खून

566 0

येरवडा कारागृहातून नुकत्याच सुटलेल्या मोक्कातील गुन्हेगाराचा कोयता, पालघन व दगडाने ठेचून खून करण्यात आला. 

या घटनेत त्याचा साथीदारही गंभीर जखमी झाला. सनी ऊर्फ गिरीश महेंद्र हिवाळे (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे, तर परवेज ऊर्फ सोहेल हैदरअली इनामदार (वय २०, रा. तिरंगा चौक, हडपसर) हा गंभीर जखमी झाला. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तो ९ एप्रिल रोजी कारागृहातून बाहेर आला होता. सनी व सोहेल हे दोघेही कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना भेटायला त्यांची मित्रमंडळी काळेपडळ येथील म्हसोबा मंदिर चौकात येत होती. यामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या राहुल कोळी व आकाश काकडे यांचा त्यांच्यावर रोष होता. त्यांनी सनी व सोहेल यास काळेपडाचे भाई होताय का ? तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, मंगळवारी सनी व सोहेल दोघे चौकात बसले असताना आरोपी त्यांच्या साथीदारांना घेऊन तेथे आले. त्यांनी कोयता, पालघन आणि लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करत दोघांना गंभीर जखमी केले. यामध्ये सनीचा जागेवरच मृत्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!