Breaking News

सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात ; धर्मवीर चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

402 0

शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार ? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती.

या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे.

प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे.


आजवर अनेक दर्जेदार आणि एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या १३ मे रोजी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Share This News
error: Content is protected !!