सातारा- ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात साताऱ्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला असून त्यांना आज सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्याबाबत समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
साधारण दीड वर्षांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मराठा आरक्षणाच्याबाबत खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दीड वर्षांपूर्वी फलटणमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या विरोधात सातारा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती.
सातारा पोलिसांनी चौकशीसाठी सरकारकडे त्यांचा ताबा मागितला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर चौकशीसाठी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . तब्बल 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात सदावर्ते साताऱ्यात घेऊन जात आहेत. साधारण चारवाजेपर्यंत पोलिसांचा ताफा साताऱ्यात पोहोचेल. साताऱ्यात पोहोचण्यास उशीर झाल्यास सदावर्ते यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल.