पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात एकूण 06 पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पदाची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाणार आहे.
पदाचे नाव आणि एकूण जागा- 6
1. पशुवैद्यक 01 जागा
2. पशुवैद्यकीय अधिकारी 04
3. क्युरेटर 01
शैक्षणिक पात्रता-
1 ) पशुवैद्यक पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी ( B.V.Sc & AH )
2 ) पशुवैद्यकीय अधिकारी पशुवैद्यक शास्त्रमधीलपदवी पदवी ( B.V. Sc & AH )
3 ) क्युरेटर पशुवैद्यक शास्त्रमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी / झुलॉजी / वाइल्ड लाईफ सायन्स विषयात P.hd + अनुभव
नोकरीचे ठिकाण पिंपरी-चिंचवड असून सहा महिन्याचं एकत्रित मानधन 60,000 आहे. मुलाखतीची अंतिम तारीख 25 एप्रिल 2022 आहे. मुलाखत देण्याचा पत्ता मा. आयुक्त यांचे कक्ष , 4 था मजला , पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी पुणे – 18
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. https://www.pcmcindia.gov.in/marathi/