Accident News

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

458 0

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बर्निंग बसचा (Accident News) थरार पाहायला मिळाला आहे, प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

बसनं पेट घेतल्याचं लक्षात येताच बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आलं, या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.ही बस मुंबईहून पुण्याकडे येत असताना ही दुर्घटना घडली.

या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच खोपोली,टाटा अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.बसने एक्स्प्रेस वे वरच पेट घेतल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!