मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार ? काय आहे कारण ?

158 0

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची काल ठाण्यात भव्य सभा झाली. भाषणापूर्वी व्यासपीठावर राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. सत्कारानंतर राज ठाकरे यांनी तलवार उंचावली होती. याच कारणाने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता येत आहे.

याशिवाय, राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणाचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या भाषणात एखादे आक्षेपार्ह वक्तव्य आढळल्यास त्यावरूनही राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उत्तरसभेआधी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली तलवार राज ठाकरे यांनी उंचावली. यापूर्वी मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी तलवार उंचावल्याप्रकरणी मोहित कंबोज, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांचा मशीदीवरील भोंग्यासाठी अल्टिमेटम

”३ मे राजी ईद आहे, माझी राज्य सरकारला गृह खात्याला विनंती आहे, कोणतीही दंगल कोणतीही तेढ आम्हाला निर्माण करायची नाही, आम्हाला ती इच्छा देखील नाही, महाराष्ट्राचं आम्हाला स्वास्थ बिघडवायचं नाही. पण आज १२ तारीख आहे, १२ ते ३ मे महाराष्ट्रातल्या सर्व मशीदीवरील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या, त्यांना सांगा, ३ तारखेपर्यंत सर्व मशीदीवरील लाऊडस्पीकर खाली उतरवले गेले पाहिजेत, खाली काढले पाहिजेत, ३ तारखेनंतर आमच्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.” पण ३ तारखेनंतर जर भोंगे उतरवले गेले नाहीत, तर तिकडे हनुमान चालिसा वाजवली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!