Udayanraje Bhosale

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

518 0

सातारा : अखेर भाजपने सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केली आहे.भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहीर करून उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा प्रश्न कायम असतानाच उदयनराजेंनी प्रचार आणि जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केल्यानंतर उदयनराजेंच्या नावाची घोषणा कधी होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. भाजपच्या यादी मध्ये महाराष्ट्रातून उदयनराजेंचे नाव समोर आले असून येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

राज्यातील ज्या काही तीन चार मतदारसंघांवरून महायुतीचे ताण वाढले होते. त्यापैकी एक म्हणजे सातारा मतदारसंघ असून सातारा मतदारसंघ अजित पवारांच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा सुरू असताना उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी उदयनराजे तीन दिवस दिल्लीत दाखल झाले होते. अखेर त्याचा फायदा उदयनराजेंना झाला असून त्यांना भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे
भाजपकडून उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्या ठिकाणी शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदेना उमेदवारी देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!