Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांचा भाजपाला आणखी एक धक्का ! ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

691 0

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. ताकवणे यांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ताकवणे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.

भाजपचे एकनिष्ठ म्हणून नामदेव ताकवणे यांची ओळख आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये नामदेव ताकवणे आज यवत मधील सभेत पक्षात प्रवेश करणार आहेत.राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखाना प्रकरणात नामदेव ताकवणे यांनी गंभीर आरोप केले होते. मात्र आता राहुल कुल हेच भाजपात आल्यानं नामदेव ताकवणे हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज ताकवणे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक झटका! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Nashik Accident : नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात; 12 जण जखमी

Mayurasana : मयुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!