नाशिक : नाशिकमधून एक भीषण अपघाताची (Nashik Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये पुणे -इंदौर महामार्गावर वरणे गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. ही अपघातग्रस्त बस पुणे येथून धुळ्याकडे जात असताना हा अपघात झाला. पुणे -इंदौर महामार्गावरील वरणे गावाजवळ बस पलटी होऊन हा अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी झाले असून बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ पुणे -इंदौर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.