Pune News

Pune News : पुण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला ‘हा’ बदल

317 0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल पुणे स्टेशन, कॅम्प परिसर, सिंहगड रोड, विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी 14 एप्रिलला नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्याबरोबरच कॅम्प परिसरातील अरोरा टॉवरजवळील पुतळा, विश्रांतवाडी चौक, दांडेकर पूल येथे देखील मोठ्या मिरवणुका निघतात. त्यामुळे या परिसरात गरजेनुसार 14 एप्रिलला सकाळी 6 पासून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणत्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले जाणून घेऊया…

1) शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहीर अमर शेख चौकातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी शाहीर अमर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाताना आरटीओ चौक-जहांगीर चौक मार्गाचा वापर करावा.

2) जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येत असून जीपीओ चौकातून बोल्हाई/मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक – नेहरू मेमोरियल मार्गे वळविण्यात येणार आहे.

3) पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे. पुणे स्टेशन, अलंकार चौक मार्गाचा वापर करावा

4) नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकातून वळविण्यात येत असून वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक मार्गाचा वापर करावा.

5) डॉ. कोयाजी रोडवरून नेहरू चौकाकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे वळविण्यात येणार आहे.

6) इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक इस्कॉन मंदिर चौकातून वळविण्यात येणार आहे

7) नेहरू चौकाकडून तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतूक नेहरू चौकातून वळविण्यात येणार आहे

8) महात्मा गांधी रस्त्यावरून नाझ चौकातून अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक नाझ चौकातून वळविण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव

Madha Loksabha : माढ्यामध्ये नवा ट्विस्ट; मोहितेंची एण्ट्री झाल्यास ‘हा’ विश्वासू सोडणार पवारांची साथ?

Junnar Crime : विवाहितेचे झेंगाट सुरु असताना अचानक तिसऱ्याची झाली एंट्री; अन् घडलं भयानक हत्याकांड

Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!