जुन्नर (पुणे) : जुन्नरमधून (Junnar Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्यामुळे अंगावर गाडी घालून तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोन जणांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीवर भादवी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साबीर मोहंमद शफी ब्यापारी (वय-45, रा. पणसुंबा पेठ, जुन्नर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अभिजित सोनवणे (वय-28 डिंगोरे), सहआरोपी महिला जेबा इरफान फकीर (वय-32,पणसुंबा पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. मृत साबीर मोहंमद शफी आणि जेबा इरफान फकीर हे दोघेही एकमेकांचे शेजारी होते. साबीर जेबावर एकतर्फी प्रेम करायचा. ते जुन्नर येथे राहतात. जेबा ही कांदळी वसाहतीत एका कंपनीत कामास होती. नोकरीनिमित्त ती रोज जुन्नर ते कांदळी ये जा करत होती.
अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासादरम्यान जेबा आणि अभिजित यांची ओळख झाली होती. या माध्यमातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ही माहिती साबीर मोहंमद शफी ब्यापारी याला होती. यावरून साबीर आणि अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला होता. रमजान सणासाठी गुरुवारी अभिजित हा जेबा हिच्या घरी आला होता. यावेळी तू येथे का आलास? असा जाब साबीर याने अभिजित याला विचारला. यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला.
शुक्रवारी सकाळी जेबा कांदळी येथे जाण्यासाठी जुन्नर येथून बसने निघाली होती. दरम्यान साबीर याने तिचा पाठलाग सुरु केला. याबाबतची माहिती जेबा हिने मोबाईल कॉल करून अभिजित याला दिली होती. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साबीर हा पुणे नाशिक महामार्ग लगत असलेल्या आयोध्या हॉटेल येथे उभा होता. दरम्यान अभिजित याने साबीर याच्या अंगावर कार घालून त्याला चिरडलं. या घटनेत साबीर याचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींना अटक केली. पोलिसांनी अभिजित सोनवणे आणि सहआरोपी महिला जेबा इरफान फकीर या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरक्षक महादेव शेलार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या