Punit Balan

Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट

345 0

पुणे : रोहा (जि. रायगड) या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या 42 व्या कुमार – मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 2022-23 या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने इलेक्ट्रिक बाईक बक्षीस देण्यात आली.

धाराशिव येथील अश्विनी शिंदे आणि ठाणे जिल्हयातील रूपेश कोंडाळकर (जि. ठाणे) अशी या दोन्ही खेळाडूंची नावे आहेत. या दोघांना ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते या बाईक नुकत्याच सुपूर्द करण्यात आल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पुनीत बालन यांनी स्पर्धेतील दोन सर्वोत्कृष्ट खेळाडूंना इलेक्ट्रिक बाइक देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही बक्षिसे देण्यात आली.

पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून युवा खेळाडूना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. यापूर्वी विविध खेळ खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना दत्तक घेण्यात आले असून त्यांची संपूर्ण जबाबदारी ‘पुनीत बालन ग्रुप’ने घेतली आहे. यामध्ये होतकरु आणि गुणी खेळाडूंचा समावेश असल्याने या खेळाडूंच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी या मदतीचा मोठा उपयोग होतो.

‘‘खेळाडूंमध्ये असलेल्या गुणांची कदर करून त्यांना योग्य वेळी योग्य मदत केली तर आपल्यामागे कुणीतरी आहे असा विश्वास त्यांच्यात निर्माण होतो आणि त्यांच्याकडून अधिक चांगली कामगिरी होऊ शकते. याच भावनेतून हे बक्षीस देण्यात आलं आहे. हेच युवा खेळाडू भविष्यात क्रिडा क्षेत्रात राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास आहे.’’
पुनीत बालन, युवा उद्योजक

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : वंचितकडून लोकसभेसाठीची 5 वी यादी जाहीर

Share This News
error: Content is protected !!