Rain Alert

Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

3418 0

आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, अकोल, गोंदिया आणि भंडारा या पाच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट
बुलढाणा हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसाची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident Video : 4 सेकंद अन् 5 जणांचा खेळ खल्लास; भीषण अपघाताचा Video आला समोर

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्पा सेंटर’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; 3 मुलींची सुटका

Latur Accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Shriram Patil : चर्चेतील चेहरा : श्रीराम पाटील

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!