Maharashtra Politics

Maharashtra Politics : धुळ्यात भाजपाच्या उमेदवाराचं लक्ष ‘MIM’ च्या उमेदवारीकडे

498 0

धुळ्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा उमेदवारीची माळ टाकली आहे. या मतदारसंघात दोन लाखाहून अधिक मुस्लिम मताचे ध्रुवीकरण झाल्यास त्याचा फायदा हा भाजपाला होतो असा इतिहास आहे. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट..

एकीकडे महाविकास काँग्रेस पक्ष हा उमेदवाराच्या शोधात असताना, दुसरीकडे डॉ. भामरे यांचे डोळे ‘एमआयएम’ च्या उमेदवारीकडे लागले आहेत. कारण दोन लाखांहून अधिक मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण ‘एमआयएम’च्या माध्यमातून झाल्यास डॉ. भामरे हे सहज खासदार म्हणून निवडून येऊ शकतात. 2014आणि 2019 अशा दोन्ही सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. भामरे यांनी विजय मिळवला होता. परंतु विजयाच्या हॅट्ट्रिकची संधी आहे. धुळे शहर आणि ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य आणि बाह्य तसेच बागलाण या विधानसभा क्षेत्रांत संमिश्र मतदार आहेत.

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याची असली, तरी सलग तीन वेळा काँग्रेस या ठिकाणी पराभूत झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून कोणी उमेदवारी घेण्यास इच्छुक नाहीय. काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावांची चर्चा उमेदवारीसाठी आहे. परंतु लवकरच काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे.

धुळे मतदार संघातील महत्वाची बाब म्हणजे धुळे शहर आणि मालेगाव मध्य मतदारसंघांत MIM चे आमदार आहेत. येथील जवळपास दोन लाख मतदार मानले जातात.वंचित बहुजन आघाडीने निवृत्त IPS अधिकारी अब्दुल रेहमान यांना याच अनुषंगाने मैदानात उतरवले आहे. मात्र, आता वंचितने मुस्लिम उमेदवार दिल्याने एमआयएम आणि वंचितमध्ये मताच विभाजन होणार असून त्याचा फायदा भाजपाला होणार आहे तर त्याचा काँग्रेसला जबर फटका बसणार आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना यामुळे विजयाची हट्रिक करणे सोपं जाणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ; मावळात ‘धनुष्यबाण’च चालवा : अजित पवार

Maval Lok Sabha : मावळ लोकसभेसाठीची महायुतीची समन्वय बैठक संपन्न

Satara Loksabha : शरद पवारांचं ठरलं! सातारा लोकसभेसाठी ‘हा’ उमेदवार देणार?

Pradeep Sharma : प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जन्मठेपेच्या शिक्षेवर हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Pune News : भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात

Nashik News : भाजप नेत्याच्या घराचे काम सुरू असताना 2 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Vijay Shivtare : बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट

Loksabha : लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरून रणसंग्राम; 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे रवाना

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूची संघात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या

Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!