Nashik Firing

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

451 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik Firing) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भरवस्तीत गोळीबार झाल्याने नाशिक हादरलं आहे. यामध्ये टोळक्यानं तलवारी नाचवत परिसरात गोळीबार केला. या घटनेमुळे नाशिकमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं आहे. दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर रस्त्यातच टोळीयुद्ध भडकलं. तलावारी नाचवत टोळक्याकडून भरवस्तीत गोळीबार करण्यात आला. ही घटना सिडकोमध्ये असलेल्या त्रिमूर्ती चौक परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

नाशिकच्या सिडकोमध्ये असलेल्या त्रिमूर्ती चौकात ही घटना घडली आहे. टोळीयुद्धातून हा गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!