Ashok Hinge Patil

Ashok Hinge Patil : चर्चेतील चेहरा : अशोक हिंगे पाटील

625 5

वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आज आपण अशोक हिंगे नेमके काय आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे जाणून घेवुयात…

अशोक हिंगे पाटील हे सुरुवातीला मराठा आंदोलन चळवळीमध्ये सक्रिय होते. विविध सामाजिक कामांमध्येही त्यांचा पुढाकार होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी काम करताना त्यांनी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक म्हणूनही काम पाहिले आहे. ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यात देखील सक्रिय सहभागी होते. नगर, बीड, परळी या भागात त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. मराठा आंदोलनादरम्यान त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांची नियुक्ती विभागीय अध्यक्षपदी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी बीड विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती. ही लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच त्या महायुतीच्या देखील संपर्कात होत्या. मात्र ज्योती मेटे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिल्यास प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आपण वंचितच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी बातचीत करू, असे अशोक हिंगे म्हणाले होते.

शरद पवारांनी ज्योती मेटे यांना उमेदवारी न दिल्याने मेटेंनी वंचित तर्फे निवडणूक लढवावी, असे आवाहन सुद्धा हिंगे यांनी केले होते. मात्र या आवाहनाच्या दुसऱ्याच दिवशी हिंगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कालपर्यंत मेटे यांच्यासाठी उमेदवारी मागणारे अशोक हिंगे आता स्वतः लोकसभेच्या मैदानात दिसणार आहेत. त्यामुळे बीडमध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जर मेटे यांनी देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर मात्र चौरंगी लढत अनुभवायला मिळेल.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!