Solapur Accident

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

427 0

सोलापूर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. सोलापूरमधून (Solapur Accident) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये कारने दुचाकीला धडक दिल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर हा अपघात झाला आहे. हरी जगताप असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ते मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.

कसा घडला अपघात?
सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कामती परिसरात असलेल्या वाघोली पुलावर भीषण अपघात झाला. भरधाव कारनं दुचाकीला उडवलं. या अपघातामध्ये शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. हरी जगताप असं या शिक्षकाचं नाव आहे. ते या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले होते, गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.

या अपघातामध्ये वाहनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. तर कारचा देखील पुढचा भाग मोठ्या प्रमाणात डॅमेज झाला आहे. पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!