Crime

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

490 0

पुणे : महापालिकेच्या मालकीत असलेल्या विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा हूक (Pune News) तुटल्यामुळे ठेकेदाराकडील कामगाराच्या डोक्यात पडल्यामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजता घडली असून पांडुरंग म्हस्के असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे माहिती मिळाली आहे.

पांडुरंग म्हसके असे कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांचे वय ३५ असून धनकवडीचे रहिवासी होते. म्हस्के हे इलेक्ट्रिशियनचे काम करायचे. पुणे महापालिकेच्या वतीने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असणारे नाना पेठ येथे डोके तालीमजवळ जुना विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू होते. हे काम पूर्ण होताच क्रेनचा पुढील भाग पाठीमागे घेताना हूक तुटल्यामुळे उपस्थित ठेकेदाराकडील कर्मचारी पांडुरंग म्हस्के या इलेक्ट्रिशियनच्या डोक्यात पडला. म्हस्के यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे. या प्रकरणी क्रेन जप्त करण्यात आले असून, या संबंधित समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा हूक तुटून ठेकेदाराच्या कामगाराच्या डोक्यात पडला. त्यात कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यापुढे असा अपघात होऊ नये यासाठी ठेकेदारांना क्रेनची सुरक्षितता तपासण्याच्या सूचना देण्यात येतील अशी सूचना श्रीनिवास कंदुल, विद्युत विभाग प्रमुख यांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!