Parbhani News

Pune Crime News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

552 0

पुणे : सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीवर हल्ला (Pune Crime News) झाल्याची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 11 वीत शिकत असलेल्या मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना भरदुपारी घडली. यादरम्यान एका महिलेने आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडला असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस सध्या या आरोपींचा शोध घेत आहेत.

काय घडले नेमके?
महेश सिद्धप्पा भंडारी (22) असे आरोपीचे नाव आहे. महेश जनता वसाहतीत राहत आहे. तर कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी पर्वती दर्शन येथे राहते. दोघे ओळखीचे आहेत. दरम्यान, मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. या दरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता. हे दोघे बोलत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी महेशने तिच्यावर कोयता उगारला. तिला मारहाण करीत तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. पण, त्याचवेळी एक महिला येथून जात असताना तिने हा प्रकार पहिला आणि ती जोरात ओरडली. महिला ओरडल्याने नागरिक जमा झाले. काही तरुण व व्यक्ती धावत येथे आले. पण, तरीही दोघे तरुण दुचाकी सुसाट पळवत हातात कोयता फिरवत नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न करू लागले. क्षणात मोठी गर्दी झाली. त्यावेळी तरुणाने हातातील कोयता फेकून मारला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. तत्काळ येथे पोलीस दाखल झाले. पण, तोपर्यंत दोघे दुचाकीस्वार येथून पळून गेले होते. नागरिकांनी त्यांचे फोटो व दुचाकी याचे फोटो पोलिसांना दिले. यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : वडगाव शेरीतील मेळाव्यात भाजपकडून महाविजयाचा निर्धार

Nandurbar Loksbha : आढावा नंदुरबार लोकसभेचा

Pune News : बोगस शिवसैनिकास खऱ्या आणि विजय शिवतारेंच्या कडवट शिवसैनिकाने दिले ‘हे’ उत्तर

New Financial Rules : लोकांच्या खिशाला बसणार कात्री ! ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

T-20 World Cup : T-20 वर्ल्डकपमध्ये विकेटकिपर म्हणून कोणाची लागणार वर्णी?

Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला डाव; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Pune News : मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी…. पुण्यात झळकले अजब पोस्टर

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!