Nandurbar Loksabha

Nandurbar Loksbha : आढावा नंदुरबार लोकसभेचा

617 0

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून (Nandurbar Loksbha) काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी असून या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यात चार आणि धुळे जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

कोणत्या पक्षाचे आहे वर्चस्व?
नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.  नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश  आहे. यात अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असून साक्री मतदार संघात शिंदे गटाचे आमदार आहेत. नंदुरबार, शहादा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून नंदुरबार मतदार संघात भाजपाचे नेते व विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि शहादा तळोदा मतदारसंघातून भाजपाचे राजेश पाडवी हे आमदार आहेत.  तसेच शिरपूर मतदारसंघात भाजपाचे काशिनाथ पावरा हे आमदार आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी.पाडवी हे आमदार आहेत.  नवापूरमध्ये आमदार शिरीष नाईक हे आमदार आहेत. तर साक्री विधानसभा मतदार संघात शिंदे गटाच्या मंजुळा गावित या आमदार आहेत पक्षीय बलाचा विचार केल्यास या लोकसभा मतदार संघात महायुतीचे वजन जास्त दिसून येत आहे. यामध्ये सहा पैकी चार  मतदार संघ महायुतीच्या जाळ्यात असल्याचे चित्र आहे.

मात्र नवख्या ॲड. गोवाल पाडवी यांनी उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसमध्येच अनेकांना धक्का बसलेरा आहे. सर्वसामान्यांमध्ये फारसे चर्चेत नसलेल्या गोवाल पाडवी नावामुळे सारेच अवाक झाले असून काँग्रेस ची गुगली कितपत जादू करते दिसून येणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ३५ वर्षे निर्विवाद वर्चस्व होते. त्याला सुरुंग लावत भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी दोन पंचवार्षिक मोठ्या मताधिक्याने जिंकून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात इतिहास घडवलेरा आहे. भाजपच्या डॉ. हिना गावित खासदार झाल्यानंतर 2019 निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी होऊन सुद्धा 2019 सालच्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य 2014 च्या निवडणुकीपेक्षा कमी झाले होते.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
2019:  हिना गावित (विजयी उमेदवार- भाजप)
2014: हिना गावित (विजयी उमेदवार- भाजप)
2009: माणिकराव गावित (विजयी उमेदवार- काँग्रेस)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : बोगस शिवसैनिकास खऱ्या आणि विजय शिवतारेंच्या कडवट शिवसैनिकाने दिले ‘हे’ उत्तर

New Financial Rules : लोकांच्या खिशाला बसणार कात्री ! ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

T-20 World Cup : T-20 वर्ल्डकपमध्ये विकेटकिपर म्हणून कोणाची लागणार वर्णी?

Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला डाव; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Pune News : मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी…. पुण्यात झळकले अजब पोस्टर

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!