Ajit Pawar

Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला डाव; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

544 0

धाराशिव : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही जागांचा तिढा सुटला नसल्यानं या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. यामध्ये धाराशिव मतदार संघाचा समावेश आहे. धाराशिवमध्ये अजूनही महायुतीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आता या मतदार संघात एक नवा ट्विस्ट आला आहे.

धाराशिव मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ चार वर्ष बाकी असल्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून इतर पर्यायाची चाचपणी करण्यात आली.

दुसरा पर्याय म्हणजे धाराशिवच्या जागेसाठी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं नाव देखील चर्चेत होतं. त्यामुळे आता राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या आज दुपारी तीन वाजता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. तर दुपारी चारपर्यंत राष्ट्रवादीकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Pune News : मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी…. पुण्यात झळकले अजब पोस्टर

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!