Rohit Pawar

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

542 0

पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दूध खरेदीचा 80 कोटींचा घोटाळा उघड केल्यानंतर आज त्यांनी दुसरा मोठा घोटाळा उघड केला आहे. अ‍ॅम्ब्युलन्स खरेदीमध्ये 6500 कोटींचा झाल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके काय म्हणाले रोहित पवार?
राज्यात आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदी तब्बल सहा हजार पाचशे कोटींचा घोटाळा झाला आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री हाफकिन संस्था की माणूस हे ओळखण्यात गलत करतात मात्र पैसे खाण्याच्या बाबतीत कधीही चूक करत नाहीत हेच सिद्ध होत आहे.
सदरील ॲम्बुलन्सच्या खरेदीसाठी प्रक्रिया राबवण्यासाठी 4 ऑगस्ट 2023 व 15 मार्च 2024 या दोन तारखांना जीआर काढण्यात आले होते.
दुसऱ्या जीआर नुसार आपल्या मर्जीतील कंपन्यांना फायदा मिळावा म्हणून दर वाढवण्यात आले व दलाली खाण्यात आली.
मार्केटमध्ये चालू असलेले दर व सरकारने खरेदी करताना लावलेले दर बघितले तर या घोटाळ्याचा अंदाज येईल.
मार्केट रेट पेक्षा दुप्पट किमतीने ऍम्ब्युलन्स खरेदीसाठी परवानगी देण्यात आली.
सुमित फॅसिलिटीज लिमिटेड बीव्हीजी कंपनी एसएससी कंपनी या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले.

रोहित पवारांनी उपस्थित केले प्रश्न?
सुमित कंपनी सोबत एमओयु साईन केला असताना ती कंपनी इनसाईडर असताना अशा प्रकारचे टेंडर का दिले गेले?
बीव्हीजी कंपनीला कंत्राट मिळावे म्हणून दिल्लीतल्या एका नेत्याने लॉबिंग केली तो नेता कोण आहे?
एमएसजी या कंपनीला काही देशांमध्ये ब्लॅकलिस्ट केले असताना इथे कंत्राट का दिले गेले? असे प्रश्नदेखील रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!