मुंबई : एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. देशातील चार महानगरांमध्ये गॅसचे दर कमी झाले आहेत. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 30-32 रुपयांनी घट झाली आहे. मार्च महिन्यात सिलिंडरचे दर वाढले होते. एप्रिल महिन्यात व्यावसायिक, हॉटेल इंडस्ट्री आणि छोटे व्यवसायिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वर्षभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांहून अधिक घट झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीबद्दल बोलायचे झालं तर त्यात कोणताही बदल झालेला नाही. 9 मार्च रोजी शेवटचे दर बदलले होते मात्र त्यानंतर सलग तेच दर आहेत. त्यामुळे गृहिणींना कोणताही दिलासा मिळाला नाही.
घरगुती गॅस सिलिंडरची किंमत
राजधानी दिल्ली- 803 रुपये
कोलकाता- 829 रुपये
मुंबई – 802.50 रुपये
चेन्नई- 818.50 रुपये
कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत
राजधानी दिल्ली- 1764.50 रुपये
कोलकाता- 1879 रुपये
मुंबई – 1717.50 रुपये
चेन्नई- 1930 रुपये
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश